कोरोनाविषाणू काळात शिक्षण आणि शिक्षण यांचा संबंध
करुणा विषाणू
या विषाणूंचा संबंध विषाणूंच्या एका अशा परिवाराशी आहे ज्यामुळे सर्दी खोकला होऊ शकतो हा विषाणू आज पर्यंत कोणत्याही देशात आढळून आला नव्हता डिसेंबर 2019 मध्ये चीन देशाच्या होऑन शहरात याची सुरुवात झाली आणि बघता बघता सर्व जगात माणसांना या विषयांची लावण व्हायला सुरुवात झाली
सर्व जग जणू स्तब्ध झाले जगातील बाजार पेठा शैक्षणिक संकुले मॉल्स सर्वकाही ठप्प झाले त्यात भारत आणि आपले कर्नाटक राज्य ओघानेच आले राज्यातल्या शाळा कॉलेजेस बंद पडल्या त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम झाले आहे
वरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेता सरकारने यावर बऱ्याच सकारात्मक योजना हाती घेतले आहेत जसे चंदना दूरदर्शन वाहिनीवर विद्यार्थ्यांना पाठ शिकवले जात आहे ते विद्यार्थ्यांनी पाहण्यास हरकत नाही एकंदरीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाढीसाठी सरकारने जर दररोज एक वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून आठवडी म्हणजेच 7दिवसाची अभ्यास देण्यास हरकत नाही
आज-काल तंत्रज्ञान बरेच पुढे गेलेले आहे तर आपण तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्यास काहीच हरकत नाही शाळेच्या प्रमाणामध्ये दररोज एक किंवा दोन वर्गाचे विद्यार्थी बोलावून एखादा मोठा डिजिटल पडदा किंवा टीव्ही बसून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिल्यास उत्तम परिणाम येण्याची शक्यता आहे
गाव पातळीवर पालकांमध्ये जागृती निर्माण करून साक्षर पालकांना विद्यार्थ्यांना गृहकार्य मध्ये मदत करण्यास मार्गदर्शन करता येईल त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात वाढ होईल गावात गल्ली चाळीमध्ये डीएड बीएड धारक स्वयंसेवक असतात प्रसंगी त्यांची मदत घेता येईल एकंदरीत खालील योजना राहिल्यास उत्तर परिणाम येऊ शकतात
1) सम विषम( दररोज एक वर्ग) क्रमांक आणि वर्ग भरविणे
2) चाळीतील डीएड बीएड धारकांची मदत घेणे
3) साक्षर पालकांचा सहभाग घेणे
4) शाळा प्रांगणात डिजिटल बोर्डाची व्यवस्था करणे
5) दूरदर्शन टीव्ही इंटरनेट यांचा वापर करणे
6) आठवडी गृहकार्य देणे
No comments:
Post a Comment